About
श्री. गणेश महाराज मुळे हे एक अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चशिक्षित असून आणखी लेखक, कथाकार, कीर्तनकार आणि उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. सनातन शास्त्राचे कालातीत असणारे ज्ञान व्यावहारिक आणि सुलभ बनवून समाजापुढे मांडतात. वैदिक ग्रंथ आणि संतसाहित्य सर्वांना समजेल अश्याप्रकारे समजावून सांगतात. ते सर्व वयोगटातील श्रोत्यांना समजेल अश्या पद्धतीने शिकवतात. त्यांची पुस्तके, अभ्यासक्रम आणि व्याख्याने हजारो लोकांना प्रेरणा देतात.
समाजात भागवत धर्माच्या शिकवणींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पूर्णवेळ कार्य करीत आहेत. मुलांवर आध्यात्माचे उत्तम संस्कार होण्यासाठी बालसंस्कार पुस्तक आणि एकादशी व्रताची संपूर्ण सखोल शास्त्रीय माहिती देणारा एकादशी प्रताप अश्या दोन ग्रंथाचे लेखन यांनी केले आहे.
मूळतः यांचे भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील एक छोटेसे उदनापूर नावाचे खेडे आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी पूर्ण करून काही काळ शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले. महाराष्ट्राचे आध्यात्मिक माहेरघर असणाऱ्या पंढरपूरात राहून वैदिक साहित्यांचा प्रचार-प्रसार करीत आहेत. विशेषता गुरुकुल पद्धतीचा अनुभव करून तेथे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य करीत आहेत.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुलांना गुरुकुल प्रशिक्षण, युवकांना मार्गदर्शन व धर्माचा प्रचार प्रसार करणे अशी अनेक कार्ये आजगत चालू आहेत. गावागावात आपल्या वैदिक संस्कृतीला पोहोचवण्याचे कार्य करताना सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून सनातन धर्माचा प्रचार प्रसार करीत आहेत. सोशल मीडिया माध्यमाद्वारे त्यांच्या अनेक कथा, कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.
भूरिदा पब्लिकेशन स्थापन करून अनेक ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य चालू आहे. भविष्यातही भरपूर साहित्यांची निर्मिती करण्याचा मानस आहे. लवकरच आपल्या सेवेत अनेक ग्रंथ येणार आहेत.
जय हरि…. सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.
Ganesh Maharaj Mule
Author | Educator | Inspirational Speaker
